०४ सप्टेंबर २०११

ढेकुण मारून शहीद होणे...हि मर्दुमकी नव्हे !!!


मागील १०-१५ दिवसापासून दिल्लीतील रामलीला मैदानावरच्या '' लीला '' सर्वांनीच पहिल्या.. आपल्यापैकी काहींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचे समर्थनही केले. मिडीयानेही त्या '' लीला '' क्याच नव्हे क्याश केल्या. आण्णा आणि टीम च्या आंदोलनाचा धुराला उडाला. राज्य घटना.. लोकशाही... संसदेला जेवढे वेठीस धरता येईल तेवढे आण्णा आणि व त्यांच्या सवंगड्यांनी धरले.... असो, अंधपणे पाठींबा देणे हा माझा स्वभाव नाही अन ते आमच्या स्वभावाला पटतही नाही. एक पत्रकार म्हणून प्रवाहाच्या विरोधात जाउन सत्यता पडताळून पाहणे कधीही चंगले. सांगण्याचा मुद्दा असा की, लोकपाल... भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचे प्रभावी हत्यार, असा समज आण्णा व त्यांच्या समर्थकांचा आहे. हरकत नाही. भ्रष्टाचाराचा थेट फटका सामान्य माणसालाच बसतो. त्यामुळे भ्रष्टाचारचे समर्थन कोणीही करणार नाही. पण, आणांच्या लोकपाल संकल्पनेत NGO' s,नाहीत. जे योजनांच्या नावाखाली करोडो रुपयांचा मलिदा लाटतात. लोकपाल च्या कक्षेतून खाजगी एन जी ओ ना वगळण्याचे कारण काय ? कि अण्णा हजारेंपासून केजरीवाल, बेदी, स्वामी अग्निवेश यांच्या एन जी ओ आहेत आणि त्यांना करोडो रुपये अनुदान आणि मदत मिळत असते म्हणून ? लोकपाल कक्षेत सरकारी अधिकारी-कर्मचारी नाहीत...(आता बोंब झाल्यावर आण्णांना हे सुचले) गावच्या ग्रामसेवकापासून ते मंत्रालयातील साचीवान्पार्यंत सामान्य मानसंची अडवणूक होते. प्रश्न काळ्या पैश्याचा ? मध्यंतरी स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेविबद्दल या मंडळींनी बरीच ओरड केली... ते समर्थनीय होते. पण, आण्णा आणि मंडळींनी भारतातील धार्मिक भ्रष्टाचार किंवा तेथे श्रद्धेच्या आडून केल्या जाणाऱ्यागोरख धंद्याबद्दल मात्र चुप्पी का बरे साधली असावी ? अण्णा धार्मिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्दलही जरा बोला. भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार धार्मिक क्षेत्रात होतोय. भारतात बाबा, बापू, भैयू, साध्वी, महाराज यांच्याकडे लाखो-करोडो रुपयाची मालमत्ता आहे. पण त्याबद्दल अण्णा किंवा त्यांचे सहकारी अवाक्षरही काढत नाहीत. नुकतेच केरळ मधील पद्मनाभ मंदिरात एक लाख कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. ती संपत्ती निर्विवादपणे राष्ट्राची असताना काही महाभाग मंदिर व्यवस्थापनाचा अधिकार प्रस्थापित करू पाहत आहेत. आज अनेक बाबा लोक अण्णांच्या आंदोलनात अग्रभागी आहेत. त्यांचीही संपत्ती जाहीर झाली पाहिजे. एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आण्णा आणि मंडळींनी त्यांची उत्तरे दिली पाहिजेत. प्रती गांधी बनून लोकांच्या भावनेशी जास्त काळ खेळणे अंगलट येऊ शकते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली या देशाची घटना आणि लोकशाही साऱ्या जगात आदर्शवत ठरली आहे. पण, आण्णा व त्यांच्या बगलबच्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य घटनेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णा आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली घटना बदलण्याचे आणि घटनेबद्दल अपप्रचार करण्याचे षडयंत्र तर राबवत नाहीत ना अशी शंका यायला लागली आहे. न्या. बी. जी. कोळसे-पाटील म्हणतात, ''देशाचा कारभार हा भारतीय घटने प्रमाणे चालतो. तीच सर्वश्रेष्ट आहे . घटनेनुसार कायदे करायचे अधिकार फक्त पार्लमेंटला व विधानसभेला आहेत. सिविल सोसायटीला कसा कायदा असावा किंवा कायद्यात काय दुरुस्त्या असाव्यात एवढाच सांगण्याचा अधिकार आहे. मी म्हणतो तो कायदा पास करा असे दडपण, उपोषणाच्या माध्यमातून कितीही मोठ्या माणसाला आणता येत नाही. अण्णांनी त्यांचे लोकपाल बिल पार्लमेंटला दिले आहे येथेच आणांचे काम संपले आहे. त्यामुळे अण्णांनी यापुढे सतत उपोषण करून दबाव न आणणे यातच खरे हित आहे. एक ध्यानात घ्या...... ''आण्णा तुम्ही महान आहात... पण घटनेपेक्षा लहान आहात''तूर्तास एवढेच...........

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

उल्लेखनीय कामगिरी! लेख आवडला, त्यातील मर्म ही आवडले!

prafull म्हणाले...

ho barabor mhanalat tumhi... JAI BHIM

Prof.Bapu Ghokshe म्हणाले...

उत्तम लेख आहे... भारताच्या महान घटनेच्या विरोधात षडयंत्र सुरु असल्याचा वास येतो... सन्माननीय अण्णांनी टीम तपासून घ्यायला हवी आहे.

sudhir choudhari म्हणाले...

sarkari anudanatun ghadaleli pidhi sarkarachi pathrakhan karnarach!pan apan he visarato ki he sarkar aaplayech anudhan ghevun (tax) aaplyavar upkar karat nahi.

yogesh wasnik म्हणाले...

Superb Article Sir...:)
Ani raajkaaran hey kahi bahucharchit gharaanyan sathich ahe hey asa aapan siddh karun dakhvila...
Khara tar kuni ya goshti kade laksh det nai...pn kholvr vichar kelyas hey raajkaarana ch pahila paaul ahe...satta parivartan jhalyashivay kontehi parivartan hou ch nay shakat...
Maहाराष्ट्राच्य ा राजकारणापुरते बोलायचे झाल्यास आजपर्यंत या राज्यातील सत्ता अवघ्या ४५घराण्यांभोवतीच फिरते आहे.
Hey vishesh asa ahe ani haadaav kuthetari modaaila pahije...

pravin म्हणाले...

घटनेच्या कोंदणात कि राजकर्त्यांच्या खिशातला लोकपाल हवा? आज CBI ,कोर्ट,सारख्या स्वायत्त संस्था सुद्धा यांच्या हातातच आहेत साधे पोलिसांना त्यांचे नियमाप्रमाणे काम करू दिले जात नाही शेंबडे पोरगे सुद्धा नगरसेवकाची भीती पोलिसाला घालते आणि बिचारे पोलीस घाबरतात सुद्धा, राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला तर गुन्हेगारी नक्कीच कमी होईल कालचा पाकीटमार मटका, बहाद्दर,हात भट्टीची दारू विक्रेता,बलात्कारी उद्या निवडणूक लढून आमदार,खासदार होतो हे घटनेचे उल्लंघन नाही? भारताची राज्यघटना ही केवळ भारतीयांनी नाही तर अख्या जगाने मान्य केली आहे की ती किती सर्वश्रेष्ट आहे. आज जर ही घटना व्यवस्थित अमलात आणली असती तर अण्णा ना हि वेळ आलीच नसती.टप्प्या टप्प्याने काम करणे हुशार माणसाचे लक्षण आहे. जन-लोकपालमूळे भ्रष्टाचार पूर्णपणे बंद होणार नाही हे शेंबडे पोरगे सुद्धा सांगेन! अजून खूप व्यवस्था बदल करावे लागतील हे सुद्धा स्वच्छ आहे. परंतु कुठेतरी सुरुवात करावी लागेन. लोकपाल साठी ६० वर्षे लागत असतील तर बाकीच्या बिलाना किती? घटनेच्या कोंदणात लोकपाल हवा हे ठीक आहे, पण त्यासाठी घटनादुरुस्ती केलीच पाहिजे. राजकारणापायी आतापर्यंत शेकडो वेळा घटनादुरुस्ती केली होती, मग आता तसा ठराव का नाही आणत, यांचे पितळ उघडे पडेल म्हणून? शहाबानू प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल रद्दबातल करण्यासाठी घटना दुरुस्ती मुस्लिमांच्या मतापायी करून स्त्रियांच्या अधिकारावर घाला घातला. महिला विधेयक मंजूर करणे हे देखील घटनेच्या कोंदणात बसत नाही काय? भ्रष्टाचार हा घटनेच्या कोंदणात बसतो काय? बसत असल्यास भ्रष्टाचाराला सरळ मान्यता द्या. संसद सर्वोच्च आहे पण संसदेतील माणसे नव्हेत! ती आपणच निवडून पाठवलेली आहेत.