१३ डिसेंबर २०११

रिपब्लिकन पक्षाची वाताहत: दोषी कोण ?


रिपब्लिकन पक्ष... खरंच नावात दम आहे.पण दुर्दैव आज हा पक्ष विकलांग झाला आहे.
यात नवे ते काय? असा प्रश्न उपस्थित होईल. पण; जरा धीर धरा... मुद्दाम हा विषय चर्चेला आणलाय. नव्या पिढीलाही कळाले पाहिजे... बरीच अतिउस्ताही मंडळी उठसुठ रिपाईला टार्गेट करणारे लेखन करीत आहेत, त्यांनीही थोडे अंतर्मुख व्हावे. याचबरोबर विविध प्रसार माध्यमेही जाणीवपूर्वक उलटसुलट विधाने करून समाज संभ्रमित करीत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन हे लिहिण्याचे धाडस केले आहे... असो,

विश्व्रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाचा हा पहिलाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. त्यापूर्वी त्यांनी १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. परंतु, जातीविरहित वर्ग निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांना धर्मांतर करण्याशिवाय पर्याय नाही असे वाटले. नेमकी ही बाब मातंग, चर्मकार, ढोर, मेहतर, तमाम शोषित-वंचितांना खटकली. ते सारे स्वतंत्र मजूर पक्षापासून दूरच राहिले. परिणामी स्वतंत्र मजूर पक्षाला म्हणवे तसे पाठबळ मिळाला नाही त्यामुळे तो बरखास्त करून बाबासाहेबांना १९४२ साली ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षाची स्थापना करावी लागली; पण या पक्षातही अनुसूचित जातीतील महार वगळता अन्य दलित जाती सहभागी झाल्या नाहीत. वस्तुत: अनुसूचित जातीतील सर्व जातींना सवलती मिळवून देण्यात, सा-या वंचीताना न्याय मिळवून देण्यात बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. तरीही १९४२ व १९५२ च्या निवडणुकीत ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन'ला जबर पराभव स्वीकारावा लागला. ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’कडे हिंदू समाज एकजातीय पक्ष म्हणून पाहत होता. पक्षाला उच्चभ्रूंची मते मिळत नव्हती. पुढे स्वतंत्र भारतात जातीय पक्षांची गरज नाही, हे राजकीय वास्तव बाबासाहेबांनी जाणले व त्यांनी ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

रिपब्लिकन पक्ष व्यापक व्हावा म्हणून आचार्य अत्रे व एस.एम. जोशी यांनी या पक्षात सामील व्हावे, अशी पत्रे बाबासाहेबांनी उभयताना लिहिली होती. डॉ. राम मनोहर लोहियांशीसुद्धा पत्रव्यवहार केला होता. भारतीय समाजाचे प्रश्न जातीच्या चौकटीत सोडविणे शक्य नाही, तर ते सोडविण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन, वर्ग जाणिवा व धर्मनिरपेक्ष विचार हेच खर्‍या अर्थाने उपयुक्त ठरतील, असे त्यांचे मत होते. रिपब्लिकन पक्ष म्हणजे एक डावा पुरोगामी पक्ष व्हावा आणि त्याने तमाम दलित, पीडित, शोषित वर्गाचे हित जोपासावे, अशी बाबासाहेबांची रिपब्लिकन संकल्पना होती. दुर्दैवाने बाबासाहेबांचे अकाली महापरीनिर्वान झाले.

आता मुळमुद्यावर येऊ... बाबासाहेबानंतर दादासाहेब गायकवाडापासून ते आजच्या रामदास आठवले, प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि इतर नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाची धुरा खांद्यावर घेतली... या देशात मागास प्रवार्गाने सत्तेची किंवा नेतृत्वाची स्वप्ने बघू नयेत, समाज एकसंघ राहू नये, अशी इथल्या सा-याच प्रस्थापित राजकीय पक्षांची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांनी सतत ''तोड-फोडीचे'' राजकारण केलेले आहे. काँग्रेस किंवा राष्ट्वादी काँग्रेसला बाबासाहेबांचे अनुयायी संघटीत होणे पडवणारे नाही. बहुजन समाज संघटित झाला तर काँग्रेस, सेना-भाजपला पर्याय निर्माण होऊ शकतो, म्हणून ते रिपब्लिकन पक्षाला संघटीत होऊ देत नाहीत. दलित नेत्यांना सत्तेचे गाजर दाखविले की तेही रातोरात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, सेना-भाजपचा जयजयकार करण्यात मश्गुल होतायेत... सध्या दुस-या फळीतल्या कार्यकर्त्यांनाही चंगळवादी राजकारणाची चटक लागलेली आहे. समाजही नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहत काँग्रेसमागे फरफटतोय... अन्य मागास,वंचित समाज काहीही झाले तरी रिपाईला आपला पक्ष मानायला तयार नाही... एकंदरीत महाराष्ट्रात या पक्षाचे चित्र वाईट आहे.
मग, प्रश्न येतो कि युपी मध्ये बीएसपी सत्तेत येते कशी....? मला तरी वाटते मायावती ह्या फुले-शाहू-आंबेडकर-बुद्धांचा कितीही जयघोष करीत असल्या. पण त्यांनी धर्मांतर तर केले नाही ना...? या भूमिकेतूनच त्यांना तिथे सर्व जाती समूहाचे पाठबळ मिळत असावे.

तात्पर्य:- महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वाताहतीला एक नाही तर अनेक करणे आणि घटक जबाबदार आहेत.

५ टिप्पण्या:

sanjay ahire म्हणाले...

आर पी आय चे नेते कधीच एकत्र येवू शकत नाही, ते एकत्र येत नाहीत म्हणून समाजाची फार हानी झाली आहे त्यांच्या एकत्र येण्याची अजून किती वर्ष वाट पहायची त्यासाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतला दुसरा एखाधा नवीन पक्ष काढावा व नवीन हुशार, कर्तबगार लालची नसलेलेल्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी उशिरा का होईना पण यातूनच काहीतरी मार्ग निघू शकतो.

sanjay ahire म्हणाले...

आर पी आय चे नेते कधीच एकत्र येवू शकत नाही, ते एकत्र येत नाहीत म्हणून समाजाची फार हानी झाली आहे त्यांच्या एकत्र येण्याची अजून किती वर्ष वाट पहायची त्यासाठी बाबासाहेबांच्या संकल्पनेतला दुसरा एखाधा नवीन पक्ष काढावा व नवीन हुशार, कर्तबगार लालची नसलेलेल्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी उशिरा का होईना पण यातूनच काहीतरी मार्ग निघू शकतो.

nagesh म्हणाले...

दुःखामध्ये डोळ्यातुन धार आणु नका!
संकुचित जगण्याला सार माणु नका !
जिवनाला कधि भार माणु नका !
भिमरायांचि शपथ जिवनात हार माणु नका !
गाढवांच्या संगति राहाल तर माति व्हाल
"भिमरायच्या" विचारानि जगाल तर भारतरत्न व्हाल!

फेरफटका म्हणाले...

धन्यवाद....मित्रांनो

अनामित म्हणाले...

jai-bhim,
tumchya ya prayatnala hardik sadiccha. RPI MS madhye watahat zaleli ahe barobar tyaladurdarushti aslela neta labhala nahi hehi barobar pan dharmantar na karta mayawati jastiche mat milaun CM ahe yat kahi dam nahi. tyache karan ase ki babsaheb dharmantar na kartach ya RPI la nirman karun jinkaun det hotech, kontyahi swarthi hetu shiway tehi hadachya kryakrtylach seat dyayche,pan mayawati fakt ani fakt paisewalya lokanach ticket dete ani kontyahi parissthitit tyanna watel titka paisa kharch karyala lawte result tumchya samor ahe.RPI che nete atta fakt shootout che malak ahet tyanna hatvinyacha was samajala tyanchya pasun dur thewnyacha hach upay ahe ani 1ki la na mananare je nastil tyanchyawar samajik bahishkar.2 bab ashi ki apan dharmantarit zalo pan tyala aplya giwanat utaraun ghtlele nahi tyamule apan buddha-babasaheb yanchya buddha dhamma nirmiti ani tyachi diksha denyachi babanchi iccha apan samjloch nahi mahnun apan ase ahot. ata young generaton ni samor yeun entrance in the politics che dhade gheun join politics karave,samata sainik dala tun samajkaran ani buddhist society of india tun dhammakaran yanchi 1ki karnyasahi tayar ahot kay yachi nishchiti ahe kay? me tayar ahe n mzya sarkhech 10 anikhi should u collect thaat people with this application which is most powerfull in this era? my mailid-83roshanpatil@gmail.com